सोलापूर : श्री संत मुक्ताई प्रतिष्ठान आणि आधार योगा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांच्या प्रेरणे तसेच आधार योगा ग्रुपचे संस्थापक यांच्या मार्गदर्शन खाली तीन दिवसीय मोफत ध्यान साधना शिबिर संपन्न झाले.
श्री संत मुक्ताई मंदीरात 6.30 ते 7.30 या वेळेत २१ ते २३ ऑगस्ट रोजी हार्ट फुलनेस ध्यान संस्थेतर्फे हे शिबीर पार पडले. यात प्रामुख्याने ध्यानातून होणारे फायदे या विषयावर प्रशिक्षक एम जे गुरव यांनी प्रात्यक्षिक पर मार्गदर्शन केले.तीन दिवस झाल्याला या शिबिरात अनेक नागरिकांनी भाग घेऊन या शिबिराचा लाभ घेतला. तसेच रोज याठिकाणी 6.30 ते 7.30 योग साधना ही सुरू असते.