राज्यभरातील गोविंदा पथकांनी जिंकली सोलापूरकरांची मने : सोनाई फाउंडेशन व स्वयंम शिक्षा फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
सोलापूर : वरूणराजाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर जमलेले गोविंदा, गोविंदा पथकांनी दिलेली ६ थरांपर्यंतची सलामी, श्वास रोखून दहिहंडीकडे खिळलेल्या सर्वांच्या नजरा अन् दहीहंडी फोडताच झालेला जल्लोष…. अशा अत्यंत उत्साही अन् आनंदमयी वातावरणात सोलापूरकरांनी ५ लाख रुपये बक्षिसाच्या दहीहंडीचा थरार गुरूवारी अनुभवला. ठाणे येथील बाल हनुमान महिला पथक या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडून ५ लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले.
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सोनाई फाउंडेशन व स्वयंम शिक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जुळे सोलापुरातील भंडारी ग्राउंडवर गुरुवारी या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी आमदार राम सातपुते यांच्या हस्ते आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय भोसले, संयोजक सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड तसेच स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अण्णाप्पा सतुबर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, महेश भंडारी, माजी नगरसेविका संगीता जाधव, अश्विनी चव्हाण, राजश्री चव्हाण, मागास समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन चव्हाण, शंकर जाधव, माजी सरपंच धर्मराज पुजारी, डॉ. संतोष राठोड, लाला राठोड, दीपक पवार, सिनेअभिनेते संतोष कासे, विजय शाबादी, श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमोडे, सरपंच सुजाता शास्त्री, बंडू कदम, शाम धुरी, दीपक पवार, मेनका राठोड, वैशाली शहापुरे, विश्वनाथ आमणे, युवराज चव्हाण, राहुल अनंतपुरकर, रसूल पठाण, दयानंद भिमदे, रविकांत कांबळे, चंद्रकांत शहापुरे, पिंटू इरकशेट्टी, अविनाश राठोड, चंद्रकांत चव्हाण, माधुरी डहाळे, सुभाष व्हनमाने, अनिकेत राठोड, मनोजकुमार अलकुंटे, अशोक मसरे, दिनेश बनसोडे, चिदानंद बगले, बाबुराव काळे, बिरप्पा बिराजदार
आदी उपस्थित होते.
सिनेअभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि धनश्री काडगावकर यांचे नृत्य आणि सोलापूरकरांशी संवाद हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. त्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर करुन रसिकांच्या टाळ्या मिळवल्या. तसेच स्वप्निल रास्ते यांनी दोन्ही अभिनेत्रींना बोलते केले.
महाराष्ट्रातील लोकप्रिय दहिहंडी असलेले संघर्ष प्रतिष्ठान (ठाणे), संस्कृती प्रतिष्ठान (ठाणे), संकल्प प्रतिष्ठान (इंदापूर), शिवाजी नाना गावडे दहिहंडी संघ (बारामती), बाल हनुमान दहिकला उत्सव मंडळ (ठाणे), बाल हनुमान महिला पथक (ठाणे) अशा गोविंदा संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
सोनाई फाऊंडेशन व स्वयंम शिक्षा फाऊंडेशनच्या या दहीहंडी उत्सवास सोलापूर शहर जिल्ह्यासह ठाणे, मुंबई, बारामती, पुणे येथील गोविंदा पथकदेखील आली होती. बारामती येथील शिवाजी नाना गावडे गोविंदा पथकास एक लाख रुपयांचे तर इंदापूर येथील संकल्प प्रतिष्ठान गोविंदा पथकास ५० हजार रुपयांचे पारितोषिक सोनाई फाऊंडेशन व स्वयंम शिक्षा फाऊंडेशनतर्फे देण्यात आले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी सोलापूरकरांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
ऐश्वर्या हिबारे आणि पल्लवी पवार यांनी सूत्रसंचालन तर काशिनाथ भतगुणकी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
नागरिकांनी मानले संयोजकांचे आभार
तब्बल ५ लाख रुपयांचे बक्षीस असलेली मोठी दहीहंडी प्रथमच सोलापुरात आयोजित करण्यात आली होती. ही दहीहंडी पाहण्यासाठी हजारो सोलापूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. या पहिल्या इतक्या भव्य दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाबद्दल नागरिकांनी सोनाई फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड आणि स्वयंम शिक्षा फाऊंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांचे आभार मानले.
संस्कृती अन् धनश्रीच्या नृत्यासोबत थिरकली तरुणाई
सिनेअभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि सिनेअभिनेत्री धनश्री काडगावकर यांनी विविध गीतांवर नृत्य सादर करुन रसिकांची मने जिंकली. सिनेअभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि धनश्री काडगावकर यांच्या बहारदार नृत्यासोबत उपस्थित तरुणाईही थिरकली.