दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर खंडाळी पाटी येथील हॉटेल विर तेजाजी समोर एसटी बस क्रमांक MH 14 BT 4578 ची अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक पिंपरी चिंचवड वरून तुळजापूर येथे जात असताना झालेल्या अपघातात एसटी बस मधे असणारे सहा प्रवासी आणि एक कंडक्टर जखमी झाले.सदर जखमीना शेटफळ येथील १०८ या शासकीय रुग्णवाहिकेमधून डॉ पाटील, रुग्णवाहिका चालक ज्योतीराम चव्हाण आणि वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक मगंध भोसले यांनी वरवडे टोल नाका येथील ग्रस्थी पथकाच्या मदतीनें मोहोळ आणि सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले.
सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथिल ग्रस्तीपथक अमर पाटील, नवनाथ मोरे, बंडू गायकवाड, रुग्णवाहिका पथक,मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मल्लिकार्जून सोनार (PSI) आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी आदलिंगे आणि सर्जेराव यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्थी पथकाचे प्रमुख अमर पाटील यांनी दिली आहे.