सोनाई फाउंडेशन आणि स्वयंम शिक्षा फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम…
सोलापूर शहरातील सोनाई फाउंडेशन आणि स्वयंम शिक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव जुळे सोलापुरात साजरा होणार आहे. या उत्सवात दहीहंडी स्पर्धा ठेवण्यात आले असून तब्बल पाच लाख रुपयांचे पहिले बक्षिस ठेवण्यात आले आहे.
गुरुवार, दि. 22 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता जुळे सोलापुरातील भंडारी मैदान येथे या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व दक्षिण सोलापूर विधानसभा इच्छुक उमेदवार सोमनाथ उर्फ सोमेश वैद्य तसेच सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज भैय्या राठोड यांच्या वतीने या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापुरचे माजी पालकमंत्री, आमदार विजयकुमार देशमुख व आमदार राम सातपुते यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. या उत्सवाला सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि धनश्री काडगावकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.