सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीं यांच्या जात प्रमाणपत्रावरील सुनावणी अंतिम टप्प्यावर आली आहे. अक्कलकोट तहसीलदारांकडून डॉक्टर महास्वामींच्या वडिलांची 1915 मध्ये जन्म मृत्यू नोंदीचा न्याय वैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता त्यावर बुधवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे