सोलापूर (प्रतिनिधी) : लोकमंगल मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असून रोहन सुभाष देशमुख यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये मिळून सुमारे 105 शाखा कार्यरत आहेत. या मल्टीस्टेट सोसायटीची एक हजार कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल सुरू आहे. या मल्टीस्टेट सोसायटीची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून अध्यक्षपदी रोहन देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.ए. गावडे यांनी काम पाहिले. जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली.
यावेळी निवडण्यात आलेले संचालक मंडळ पुढीलप्रमाणे- अविनाश महागावकर, शिवाजी पाटील, देवीप्रसाद कुलकर्णी, शितल शहाणे, रणजित ढगे, पंडित लोमटे, बालाजी शिंदे, राजेंद्र अडगळे, प्रियांका साठे, सुधा अळीमोरे.