सोलापूर : पोलिस आयुक्तालयामध्ये गुन्हे शाखेत कार्यरत असलेले फौजदार सुनील लायप्पा हांडे यांना गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. राष्ट्रपतींकडून राज्यातील ३९ पोलिस अधिकारी, अंमलदारांची नावे बुधवारी जाहीर करण्यात आली आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडून बुधवारी शौर्यपदक, उल्लेखनीय सेवेचे पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक अशी राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये सोलापूर शहर आयुक्तालयात पूर्वी मोटार ट्रान्सपोर्ट विभागात चालक म्हणून कार्यरत असलेले सहा.
पोलिस उपनिरीक्षक यांना गुणवत्तापूर्ण सेवा कार्याबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याचे पत्र पोलिस आयुक्तालयात प्राप्त झाले. सध्या सुनील हांडे गुन्हे शाखेकडे फॉरेन्सिक वाहनावर चालक असून, त्यांची पदोन्नती होऊन ते सध्या पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत १ ऑगस्ट १९९० साली ते एसआरपीएफ गट क्र. १० मध्ये रुजू झाले. २००७ पर्यंत सेवाकाळात त्यां गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्याच कारवाई मोहिमेत विशेष योगदान दिल्या त्यानंतर शहर आयुक्तालयात रुजू झाले.
औक्षण करून आनंदोत्स
राष्ट्रपती पदक मिळाल्याची वार्ता मिळताच आपणास खूप आनंद झाल असून, कष्टाचे चीज झाले. या सेवेच्य माध्यमातून आपल्या दोन मुली,
मुलांना उच्च शिक्षण देऊ शकल्याचं भावना सुनील हांडे यांनी व्यक्त केल त्यांच्या पत्नीनेही औक्षण करून आनंद व्यक्त केला.