समस्यांचे त्वरित निराकरण करण्याच्या अधिकार्यांना सूचना
सोलापूर शहर हद्दवाढ भागातील खासगी नळ आकारणी शुल्क रद्द करावे, आरोग्य निरीक्षक व सफाई कामगारांची संख्या वाढवावी, सुंदरम नगर येथील स्विमिंग पूल क्रीडा विभागास हस्तांतरण करावे, यासह विविध मागण्यांसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांची भेट घेतली. याची अमंलबाजवणी तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकार्यांना दिल्या.
यावेळी आमदार देशमुख यांनी हद्दवाढ भागातील अमृत-2 योजनेअंतर्गत ड्रेनेज व पाणीपुरवठा संदर्भात प्रारुप आराखडा, नगरोत्थान, दलित वस्तीचे रस्ते व ड्रेनेजचे प्रलंबित कामाचा आढावा घेतला. आसरा पुलाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, त्या कामची सध्यस्थिती आमदार देशमुख यांनी अधिकार्यांकडून जाणून घेतली.
हद्दवाढ भागात अनेक समस्या आहेत. रस्त्याची समस्या, पाण्याची समस्या तसेच ड्रेनेज आणि कचर्याची समस्या आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. या सर्व समस्यांचे निराकरण लवकर करण्याच्या सूचना महापालिका अधिकार्यांना दिल्याचे आ.देशमुख यांनी सांगितले. महापालिकेच्याही काही तांत्रिक अडचणी आहेत. 15 व्या वित्त आयोगाचीही निधी आलेला नाही. तरी या सर्व अडचणी दूर करून आयुक्तांनी समस्या दूर करण्यात येतील, असे आश्वासन दिल्याचे देशमुख म्हणाले.