स्वातंत्र्य दिनानिमित्त 95 माय एफएम आणि स्पाईस एन आईस इव्हेंट्स यांच्या सौजन्याने ‘मेरा भारत महान ‘हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 15 ऑगस्ट 2024 रोजी इंद्रभवन, महानगरपालिका, सोलापूर येथे सकाळी 9 वाजल्यापासून जास्तीत जास्त लोक सहभागातून हाती तिरंगा फडकवत एक नवा विश्वविक्रम करण्याचा मानस आहे. या उपक्रमासाठी स्पेशल पार्टनर रूपम स्टील हे असून शुद्धोहम ज्वेलर्स हे असोसिएट पार्टनर आहेत.
या उपक्रमात शहरातील अनेक मान्यवर, पोलिस अधिकारी, विविध राजकीय संघटना, विविध सामाजिक संघटना, उद्योजक, व्यापारी देखिल सहभागी होणार आहेत. सहभागी झालेल्या सर्वांना विश्व विक्रमाचे प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी इंद्रभवन, महानगरपालिका, सोलापूर येथे उपस्थित राहून तुम्ही देखिल जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून या विश्वविक्रमाचा भाग बनू शकता.