मोहोळ (दादासाहेब गायकवाड) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढता धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून दि १६ रोजी यावली गावचे ग्रा प सदस्य सिद्धेश्वर जाधव यांनी स्वखर्चाने फवारणी करून परिसराचे निर्जंतुकीकरण केले.
याबाबत माहिती अशी की यावली चे तरुण कर्तव्यदक्ष ग्रा प सदस्य सिद्धेश्वर जाधव यांच्यावतीने यावली येथील प्रभाग क्र चार त्याच बरोबर गावातील समाजमंदिर, वयोवृद्ध बसणाऱ्या मंडळीचे पार आदी प्रमुख ठिकाणी औषध फवारणी करून संपुर्ण परिसराचे निर्जंतूकीकरण करण्यात आले.
आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावाची काळजी घेणे हे ग्रामपंचायत सदस्य या नात्याने आपले कर्तव्य आहे या हेतूने रमेश बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आले असल्याचे सिद्धेश्वर जाधव यांनी सांगितले.
या कामासाठी सिद्धेश्वर लोहार, दिनेश खंदारे, सादीक मुलाणी यांचे विशेष सहकार्य लाभले.