प्रिसिजनची इमॉस इंडिया कपंनी आणि ब्लुव्हील्झ कपंनी यांच्यात टाटा एस एलसीव्ही ह्या मालवाहतूक गाडीचे इलेक्ट्रिफिकेशन करण्याच्या उद्धे्शाने धोरणत्मक भागीदारीता निर्णय झाला असून त्याअंतर्गत प्रिसिजनची इमॉस इंडिया ही कंपनी ब्ल्यू व्हील्सला टाटा एस या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक एल सी व्हीचा पुरवठा करणार आहे. शाश्वत लॉजिस्टिकच्या दिशेने हे एक महत्वापूर्ण पाऊल असल्याचे कार्यकारी संचालक करण शहा यांनी सांगितले.
या संयुक्त भागीदारीचा उद्देश केवळ कार्बन फूटप्रिंट कमी करणे एवढाच नाही तर भरीव आर्थिक बचत आणि पर्यावरणीय फायद्यांचे आश्वासनही दिले आहे. विद्युतीकरणामुळे इंधन खर्च आणि देखभालीचा खर्च लक्षणीय कमी होतो.
प्रिसिजनच्या इमॉस इंडिया कंपनीने ७५ किमी, १२० किमी आणि २५० किमी श्रेणीमधील वाहने एकाच चार्जवर चार्ज करण्याची सोय उपलब्ध केली जाणार आहे. ब्लुव्हील्झकडून पॉवरट्रेन व्यवसायाची खात्रीशीर हमी मिळवताना रेट्रोफिटिंगचा खर्च फक्त २ वर्षांचा परतावा कालावधी देण्याचे वचन इमॉस इंडियाने दिल्याचे करण शहा यांनी सांगितले.
या धोरणात्मक भागीदारीद्वारे, प्रिसिजन आता उत्तर भारतातून सुरूवात करून संपूर्ण भारतभर रेट्रोफिट मार्केटची पूर्तता करेल, महत्त्वाच्या ग्राहक केंद्रित बाजारपेठेवर लक्ष्य केंद्रित करेल. तसेच व्यापक ग्राहकांसाठी शाश्वत लॉजिस्टिक सोल्यूशन्स आणणार असल्याचे करण शहा म्हणाले.
दिल्ली येथे पार पडलेल्या ग्राहक मेळाव्यात सुमारे २५ संभाव्य ग्राहकांनी हजेरी लावली, त्यांनी या नवीन विद्युतीकरण सोल्यूशन्ससाठी प्रचंड उत्साह दाखवला.
इमॉस इंडियाने सोलापूर, पुणे, मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नवी दिल्ली येथील अनेक ग्राहकांना इलेक्ट्रिक रेट्रोफिटेड वाहने या आधीच दिली आहेत.
या धोरणत्मक भागदारी घोषणेच्या प्रसंगी प्रिसिजनचे कार्यकारी संचालक करण शहा, सलील परुळेकर, यश जवळकर आणि श्री शुभम उजळंबे तर ब्लूव्हिल्झ टीमकडून साईओ चरणप्रीत सिंग सेठी, बिझनेस हेड सुनील कपूर, अभिषेक प्रभुदा, मदन सेन,प्रणय प्रकाश,मुकेश पॉल आणि हर्ष भाटी हे उपस्थित होते.