• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महसूल पंधरवड्याचा उत्साहात शुभारंभजिल्ह्यात 15 ऑगस्ट पर्यत महसूल दिनानिमित्त विविध कार्यक्रम

by Yes News Marathi
August 1, 2024
in इतर घडामोडी
0
महसूल पंधरवड्याचा उत्साहात शुभारंभजिल्ह्यात 15 ऑगस्ट पर्यत महसूल दिनानिमित्त विविध कार्यक्रम
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (दि.1) :- जिल्ह्यात महसूल विभागाचा ‘महसूल पंधरवडा’ 1 ते 15 ऑगस्टदरम्यान साजरा करण्यात येणार आहे. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागांद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा, तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा, यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने ‘महसूल पंधरवडा’ साजरा करण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी सांगितले.
या उपक्रमात दि. 01 ऑगस्ट रोजी तसेच 30 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 या तीन दिवसाच्या कालावधीत रामचंद्र मिशन मेडिटेशन सेंटर यांचेकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी ताणतणाव व्यवस्थापन करणेच्या उद्देशनाने मेडिटेशन बाबत प्रात्यक्षिक मार्गदर्शन करण्यात आले तसेच महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व मेट्रोपॉलीस लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व महसूल कर्मचारी व त्यांचे कुटुंबाकरिता महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले सदर वैद्यकीय शिबीरामध्ये रक्त तपासणी (CBC), रक्तातील साखर व रक्तदाब यांचे मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच इतर शारीरीक चाचण्या 80% सवलतीसह करण्याची सुविधा करणेत आली आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत 2 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालया येथे व्यसनाधीनतेपासून मुक्ती या विषयावर डॉ.थडसरे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तसचे जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी सदर योजनेचा लाभ युवकांना प्राप्त होण्यासाठी प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. दि. 3 ऑगस्ट 20 रोजी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, दि.4 ऑगस्ट रोजी स्वच्छ व सुंदर माझ कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, मंडळ व तलाठी कार्यालयामध्ये स्वच्छता व निटनेटकेपणा व सुंदर कार्यालय करणेकामी जिल्हास्तरावरून सर्व संबंधित अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.
कृषि मार्गदर्शन कार्यक्रम अंतर्गत 5 ऑगस्ट रोजी शेतकरी बांधवांसाठी शेती व शेतीविषयक कामे, बि-बियाने खते, पशुसंवर्धन पिक संरक्षण, धान्य साठवण, कृषि उत्पादनाचे मुल्यवर्धन प्रक्रिया व बाजारपेठ उपलब्धता इत्यादी विषयांबाबत विशेष प्रशिक्षण शिबीर जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आले आहे. तसेच शेतकरी बांधवांसाठी व अल्प भुधारक इत्यादींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना कार्यक्रम इत्यादी प्रसिध्दी देणेकामी संबंधित शासकीय कार्यालयास निर्देश देण्यात आले आहे. तसेच 100टक्के ई-पिक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे बाबत कार्यशाळा घेऊन जनजागृती करण्याबाबत शेतकरी बांधवांना सहाय्यभूत ठरणाऱ्या मोबाईल ॲप्लीकेशन याबाबत माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले.

दि. 6 ऑगस्टला शेती, पाऊस आणि दाखले, दि. 7 ऑगस्टला युवा संवाद कार्यक्रम, दि. 8 ऑगस्टला महसूल – जन संवाद, दि. 9 ऑगस्टला महसूल ई-प्रणाली, दि.10 ऑगस्ट रोजी सौनिक हो तुमच्यासाठी अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी शिमावर्ती भागामध्ये व संवेदनशील भागामाध्ये तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी सैनिक यांना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे महसूल कार्यालयाकडून निर्गमीत होणार विविध दाखल प्रमाणपत्राबाबत कार्यवाही करणेकामी सर्व महसूल यंत्रणेस निर्देश देण्यात आले आहे. तसेच संरक्षण दलात कार्यरत असताणा शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबांना जमीन वाटपाबाबतची प्रलंबित प्रकरणे तसेच त्यांचे इतर प्रलंबित प्रश्न काम तात्काळ नियामानुसार निर्गमित करणे कामी संबंधित शासकीय यंत्रणेस निर्देश देण्यात आला आहे. याबाबत जिल्हास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 11 ऑगस्टला आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रम
द‍ि.12 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा अंतर्गत जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना शासकीय योजनेची माहिती उपलब्ध करून देणे, शासकीय योजनांसाठी आवश्यक असणारे महसूल विभागाशी संबंधित दाखले, प्रमाणपत्र देणे तसेच विविध योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभाच्या अनुषंगाने जिल्हा, तालुका स्तरावरून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने उपकरणे वाटप करणे असे निर्देश देण्यात आले आहे. याबात जिल्हा स्तरावर कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे.

दि.13 ऑगस्ट रोजी महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यसाठी संवाद प्रशिक्षण अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत सर्व महसूल कर्मचारी अधिकारी यांना विविध महसूली कायदेविषयक बाबींचे प्रशिक्षण आयोजन केले आहे. दि. 14 ऑगस्टला महसूल पंधरवडा वार्तालाप कार्यक्रम.
तसेच श्री. शिवछत्रपती रंगभवन सोलापूर येथे महसूल पंधरवडा 2024 च्या सांगता समारंभामध्ये महसूल संवर्गातील कार्यरत उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांचे 2023-2024 मध्ये विशेष उल्लेखनिय कामकाजाची दखल घेऊन त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव व सत्कार करण्यात येणार आहे. तसेच कार्यरत कर्मचारी यांचे 10 वी व 12 परिक्षा 2024 मधील गुणवंत पाल्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव सत्कार करण्याचे आयोजन केले आहे. तसेच या दिवशी महसूल अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी दिली.

Previous Post

केंद्रीय अर्थसंकल्पातील भरघोस मदतीमुळे महाराष्ट्राच्या विकासाचा वेग वाढला – केशव उपाध्ये

Next Post

संभाजीनगर, धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; याचिका फेटाळली

Next Post
संभाजीनगर, धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; याचिका फेटाळली

संभाजीनगर, धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; याचिका फेटाळली

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group