सोलापूर: सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी लिंगायत समाजातुन उच्च शिक्षित असणारे व सामाजिक कार्यातून परिचित असणारे सोमनाथ वैद्य यांनी एंट्री केल्याने राजकारणाला कलाटणी मिळाली आहे.
गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून लाडू वाटप करीत सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण विधानसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
वैद्य हे सध्या पुणे येथे आमदार महेश लांडगे यांचे स्वीय सहायक म्हणून मंत्रालयात कार्यरत आहेत. दक्षिणमध्ये लिंगायत समाजाचे प्राबल्य असल्याने व वैद्य हे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार असल्याने या मतदारसंघातून विधानसमभेसाठी नशिब आजमावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मूळचे तुळजापूर येथील रहिवाशी असणारे मात्र सोलापूरात पालकमंत्र्यांचे दहा वर्ष स्वीय सहायक म्हणून काम करताना जुळे सोलापूर येथे स्थायिक झाले. त्यानंतर दहा वर्षांपासून पुणे येथे भाजपा आमदाराचे मंत्रालयात स्वीय सहायक म्हणून काम करीत असताना विविध प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे. तसेच सर्वपक्षीय नेत्यांश सलोख्याचे संबंध असल्याने दक्षिणची विधानसभा लढवायचीच असा निर्धार सोमनाथ वैद्य यांन केला आहे.
त्यामुळे दक्षिण सोलापू मधील इच्छुकांमध्ये लिंगायत समाजातील उच्च शिक्षित व प्रशासकीय सेवेत कार्यरत असणारे वैद्य यांची भर पडल आहे. त्यामुळे वैद्य यांना कोणत्य पक्षाच्या उमेदवारीची लॉटर लागणार? हे पाहावे लागणा- आहे.
तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणार
पुणे येथील विविध कंपनी व औद्योगिक वसाहतीमध्ये संपर्क आहे त्यामुळे मतदारांनी विकासाची संधी दिल्यास मतदारसंघातील तरूणांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देणार आहे . तसेच बचत गटाच्या महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सोमनाथ वैद्य यांनी सांगितले.
सोमनाथ वैद्य यांनी दक्षिणच्या राजकारणात एंट्री करताना एकावन्न हजार लाडू, पाच हजार छत्र्या, दहा हजार महिलांना पर्स व दहा हजार टि शर्ट वाटप करून जोरदार एंट्री केली आहे.