जेष्ठ कवियत्री,लेखिका डॉ अरुणा ढेरे यांची प्रकट मुलाखत
सोलापूर – प्रिसिजन वाचन अभियानांतर्गत ‘प्रेमातून प्रेमाकडे’ पुस्तकाच्या अभिवाचनाने या अभियानाचं दुसरं पान उघडणार असून सोलापूरकरांच्या प्रतिसादाला आम्ही साथ देत ऑगस्ट मधील कार्यक्रमासाठी घेऊन येत आहोत महाराष्ट्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व जेष्ठ कवियत्री, लेखिका, समीक्षिका डॉ अरुण ढेरे. अरुणा ढेरे लिखित ‘प्रेमातून प्रेमाकडे’ या पुस्तकाचे अभिवाचन आणि त्यानंतर त्यांच्या प्रकट मुलखातीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जेष्ठ साहित्यिक हेमकिरण पत्की ही मुलाखत घेणार आहेत. तर ‘प्रेमातून प्रेमाकडे’ ह्या पुस्तकाचे अभिवाचन ममता बोल्ली व जैद हसन हे करणार आहेत. सदर अभिवाचन आणि मुलाखतीचा कार्यक्रम शनिवार दिनांक ३ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ०६. २५ वा. निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे संपन्न होईल.
डॉ अरुणा ढेरे यांचा परिचय –
अरुणा ढेरे यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५७ साली पुणे येथे झाला. साहित्य अकादमी पारितोषिक विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे ह्या कन्या आहेत. बालपणापासून साहित्याचे आणि समीक्षेची वैचारिक पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे. कवयित्री कथा, कादंबरी, ललित लेख, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्य विषयक सामाजिक इतिहासपर, युवक युवतीसाठी लेखन असे सर्व वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले आहेत. २०१९ साली यवतमाळ येथे झालेल्या ९२ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही त्यांनी भूषविले आहे.
प्रिसिजन वाचन अभियानाची सुरवात ६ जुलै रोजी झाली. सोलापूरकर वाचक, रसिक प्रेक्षकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला. सोलापूर हे वाचकांचं शहर करण्याच्या आमच्या प्रयत्नाला सोलापूरकरांनी साथ दिली. वाचन अभियानाच्या पहिल्या कार्यक्रमानंतर अनेकांनी अनेक उपक्रम ही सुचवले. शाळा / कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांमध्येही वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी काही कार्यक्रम हाती घेण्यासाठी सुचवले आहे.वाचन प्रेमी रसिक सोलापूरकरांनी ’प्रिसिजन वाचन अभियानात सहभागी होऊन वाचनाचा आणि श्रवणाचा मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन प्रिसिजन फाऊंडेशन तर्फे करण्यात येत आहे.