केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या आई चंद्रकांता गोयल यांचे शनिवारी निधन झाले. पीयूष गोयल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. “आपल्या स्नेह व प्रेमाने मला नेहमी मार्ग दाखवणारी माझी आदरणीय आई आज सकाळी स्वर्गवासी झाली. त्यांनी आपले संपूर्ण जीवन सेवा करत व्यतित केले व आम्हाला देखील सेवाभावाने जीवन व्यतित करण्यासाठी प्रेरित केले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास आपल्या चरणाशी स्थान देवो, ॐ शांती..” असं पीयूष गोयल यांनी ट्विट केलं आहे. चंद्रकांता गोयल या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या होत्या. शिवाय, माटुंगा मतदारसंघातून त्या विधानसभेवर देखील गेल्या होत्या.