सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ येथे सोशल डिस्टन्स ठेवत विवाह सोहळा पार पडला. कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याचा फटका सर्वानाच बसत आहे. यंदा होणारी अनेक लग्नही पुढं ढकललीत मात्र अशा परिस्थितीत अनोखी शकल लढवत मास्क वाटप करत गोपीनाथ माने यांचा मुलगा व युवराज प्रताप यांची कन्या या दोघांनी सोलापूर सरकारी आदेशाचे पालन करत लग्न केले. या विवाहाला प्रत्यक्षात जरी कमी लोक उपस्थित असले तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक नातेवाईकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली विशेष म्हणजे ज्यांना आहेर करायचा आहे त्यानी मुख्यमंत्री सहायता निधिला मदत करण्याचे आवाहन नवदाम्पत्याकडून करण्यात आले त्यामुळे या विवाहाच सर्वच थरातून कौतुक होत आहे
हा विवाह मोठ्या दामडौलात करायचा होता मात्र लॉकडाऊन असल्यामुळे संगळीच अडचण मात्र त्यावर अनोखी शकल लढवत अगदी कमी लोकांमध्ये हा विवाह सोहळा उरकला त्यासाठी पाहुण्यांना नियंत्रण व्हाटसअँपवर देण्यात आलं तर त्यांना फेसबुक लाईव्हवर विवाहात सहभागी होण्याचा आग्रह केला नातेवाईकही आनंदाने सहभागी झाले फेसबुक वरच शुभेच्छाही दिल्या अन मोबाईलवर अक्षताही टाकल्या या माध्यमातून कोरोनाही लढाईला हातभारही लावला या अनोख्या लग्नाने गर्दी करणाऱ्यांना नवीन आदर्श घालून दिला आणि एकप्रकारे आर्थिक बाजूला फाटा देत अनेकांना हो लग्नाचा उतम उदाहरण म्हणून तालुक्यात एक आगळा – वेगळा विवाह सोहळा संपन्न झाला यावेळी सरपंच नितिन धबडे पोलीस पाटील हुसेनी भेलमे , शाहू माने ,सुभाष माने, युवराज प्रताप पत्रकार देविदास माने माजी सरपंच सिंद्राम माने आदी उपस्थित होते.