सिईओ मनिषा आव्हाळे यांचे लेखी सुचना ..!
सोलापूर – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील ग्रामपंचायती तसेच इतर मानाच्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायती मध्ये व परिसरात दि. 21 जुलै ते 25 जुलै या कालावधीत “महा स्वच्छता अभियान” राबविण्याच्या
सुचना सोलापूर जिल्हा परिषदेच्या
प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिल्या आहेत.

आषाढी एकादशी नंतर दुसरे दिवसी लगेच सिईओ आव्हाळे यांनी व्हीसी घेऊन पालखी मार्गावर साचलेला कचरा हटविणेचे सुचना दिले आहेत. आषाढी यात्रा कालावधीत पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींनी चांकले काम केले आहे. भाविकांना चांगल्या सेवा दिलेल्या. त्याचबरोबर ग्रामपंचायती मध्ये स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवले आहे.
पालखी मार्गावरील गावात “Deep Cleaning” करण्याची आवश्यकता असून त्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सुचना सिईओ आव्हाळे यांनी दिलेल्या आहेत. पाच दिवसाच्या या महा स्वच्छता अभियानात पालख्या मार्गावरील ग्रामपंचायती बरोबरच गावठाण व परिसरात वास्तव केल्यामुळे प्लास्टिकसह अन्य कचरा गोळा झालेला आहे तो वर्गीकरण करून संकलित करावा. संकलित केलेला कचरा जाळून नये. पालखी मार्गावरील डिव्हायडर (रस्ता दुभाजक) यामध्ये कचरा पडलेला आहे. झाडात अडकलेला कचरा काढून टाकणेचे सुचना दिलेले आहेत. फेकून दिलेल्या अन्नाची योग्य घनकचरा व्यवस्थापनन झाल्यास त्यामध्ये विषारी घटक तयार होऊन ते पावसाच्या पाण्यात मिसळून पिण्याच्या पाण्याच्या स्तोत्रामध्ये मिसळण्याची दाट शक्यता आहे त्या दृष्टीने काळजी येऊन योग्य व्यवस्थापन करणेचे सुचना व्हीसी मध्ये दिल्या होत्या.
ओला कचरा कंपोस्ट करण्यात यावा. प्लॅस्टिक संकलन केंद्रात तयार झालेल्या कचऱ्याची पुनर्प्रक्रिया करून विक्री करण्यात यावी. पालखी मार्गावरल या मुक्कामाच्या ठिकाणचा व विसाव्याच्या ठिकाणी तात्पुरती शौचालय बसवलेला ठिकाणी शौचालय काढल्यानंतर घाण निर्माण झाली आहे त्या ठिकाणी घाणीचे योग्य व्यवस्थापन करावे. ज्या ठिकाणी पाणी साचले आहे अशा ठिकाणी मुरूम माती टाकून नियमानुसार दुरुस्त करून घेण्यात यावेत.
नाले, गटारी तसेच ओढे या ठिकाणी साचलेला कचरा काढून घेण्यात यावा.
परिसर स्वच्छतेसाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायत मध्ये “महास्वच्छता मोहीम” राबवण्यात यावी. सर्व
बाबीचे व सूचनाचे कटाक्षाने पालन करण्यात यावे. या कामासाठी पालखी मार्गावरील गावासाठी नोडल अधिकारी नेमलेले आहेत. नोडल अधिकारी यांनी विशेष लक्ष देणेचे सुचना दिलेले आहेत. स्वच्छतेच्या कामात कोणी कुचराई करू नये. घनकचऱ्याचे वर्गीकरण करून व्यवस्थापन केलेल्या कामाची माहिती फोटो सह अहवाल या कार्यालयात पाठविण्यात सुचना सिईओ मनिषा आव्हाळे यांनी दिल्या आहेत. या व्हीसीसाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, यांचेसह गटविकास अधिकारी व सर्व पालखी मार्गावरील ग्रामसेवक उपस्थित होते.