सोलापूर : जगात तसेच भारत देशात कोरोनाच्या रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे गोर, गरीब महिलांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेमार्फत उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी, कळमण, नान्नज, मोहितेवाडी, भोगाव, खेड, बीबीदारफळ, कारंबा, गुळावंची, होनसळ या गावातील गरजू व गरीब महिलांना किराणा साहित्य किटचे वाटप करण्यात आले.
या साहित्याचे वाटप स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या संचालिका प्रेमा गोपालन ,डायरेक्टर नशीब शेख, मंगल धुमाळ ,श्यामल गुरव ,अश्विनी कोरके तसेच प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच पोलीस पाटील यांच्या उपस्थित करण्यात आले. या संस्थयेमार्फत एकूण 100 किटचे वाटप करण्यात आले .या संस्थेविषयी अधिक माहिती अश्विनी कोरके यांनी दिली.