येस न्युज मराठी नेटवर्क : जुनी मिल आवारातील संभाजीराव शिंदे विद्यामंदिरात प्राथमिक शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त बाळगोपाळांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.


संस्थेच्या संचालिका राधिकाताई चिलका यांच्या हस्ते प्रशालेचे मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर, बाल वर्गाच्या मुख्याध्यापिका वैशाली सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखीचे व संस्थेचे संस्थापक स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


यावेळी विद्यार्थ्यांनी अश्वासह गोल रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला. यावेळी हरिनामाचा गजर करत, अभंगाचे गायन करत विद्यार्थ्यांनी पाऊले खेळली.


विठ्ठल रुक्मिणी,संत ज्ञानेश्वर संत तुकाराम, संत मीराबाई संत मुक्ताबाई यांच्या वेशभूषेतील मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचे सहकार्य लाभले. यावेळी बहुसंख्य पालकांची उपस्थिती होती