सोलापूर: जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही एकादशीनिमित्त रिंगण सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम कार्यक्रमची सुरुवात डॉ राधिकाताई चिलका तसेच शाळेतील सहशिक्षिका यांच्या हस्ते पालखी पूजन व विठ्ठलाची आरती करून कऱण्यात आली. या नंतर अश्वसह रिंगण सोहळा घेण्यात आला. या वेळी सहशिक्षिका सौ .मधुरा भोगशेट्टी यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. सदर कार्यक्रम मध्ये शाळेतील विद्यार्थी नी श्री. विट्ठल रुक्मिणी, संत तुकाराम संत ज्ञानेश्र्वर, संत जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई यांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थाध्यक्ष महेश अण्णा कोठे, डॉक्टर राधिकाताई चिलका, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे ,देवेंद्र दादा कोठे , प्रथमेश कोठे, प्राध्यापक विलास बेत तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





