येस न्युज मराठी नेटवर्क : सकल मराठा समाज सोलापूर शहर जिल्हयातील सर्व तालुके आणि शहर सोलापूर येथील प्रमुख मराठा बांधवांची बैठक आज छ. शिवाजी प्रशाला येथे पार पडली.आजच्या बैठकीमध्ये मोहोळ, बार्शी ,मंगळवेढा, माढा, पंढरपूर, सांगोला ,माळशिरस, करमाळा, अक्कलकोट, ता. दक्षिण आणि उत्तर तालुक्यातून मराठा बांधव उपस्थित होते.
प्रस्तावना करताना प्रा. गणेश देशमुख यांनी बैठकी मागचा उद्देश सांगून प्रत्येक मराठा बांधव मनोज दादा जरंगे पाटील यांच्या मराठा जनजागरण शांतता रॅली मध्ये संपूर्ण जिल्ह्याचा सहभाग असावा म्हणून सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा कमिटी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करणार असून ज्या दिवशी मनोज दादा जरंगे पाटील रॅलीची तारीख घोषित करतील त्याच दिवसापासून जिल्हा कमिटी संपूर्ण तालुका दौरा आखेल. आणि घरा घरात पोहचून प्रत्येक मराठा रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.माऊली पवार म्हणाले की जारंगे पाटील यांची दहशत संपूर्ण राजकीय लोकांना महाराष्ट्रात आहे. संपूर्ण महाराष्ट्र जरांग पाटील यांच्या मागे उभा आहे, त्यामुळे मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावाच लागेल. जर नाही केला तर लोकसभेला जसा दणका दिला तसाच विधानसभेला दाखवला जाईल. रॅली ची सभा छ. शिवाजी चौकात स्टेज मारून, संभाजी महाराज चौकातून शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली काढण्यात येईल.

राजन भाऊ जाधव यांनी शिस्त, पाळण्याविषयी मार्गदर्शन केले. विजय राऊत यांनी बार्शी तालुक्यातून सर्वात जास्त कुणबी दाखले काढले तसेच इतर तालुक्यातून दाखले काढावे असे आव्हान केले, या प्रसंगी करमाळ्याचे रामदास झोल, सचिन कदम ,उदयसिंह पाटील, महेश पवार, रणजित कदम, निर्मला शेलावने यांनी आपले विचार व्यक्त केले.
या बैठकीत पुरुषोत्तम बर्डे, माऊली पवार, प्रा. गणेश देशमुख, राजन भाऊ जाधव, नाना काळे, श्रीकांत डांगे, प्रा. G.K. देशमुख , श्रीरंग लाले, महेश पवार, रामदास झोल, विजय राऊत, सचिन काळे, निर्मला शेलवणे, संजीवनी मुळे, मनीषा नलावडे,प्राजक्ता अजिंक्य पाटील, बाळासाहेब मोरे, प्रकाश ननवरे, नाना चव्हाण , शंभुराजे जयवंतराव जगताप, रणजीतसिंह शिंदे
शिवाजीराव चापले सर, रणजित कदम, प्रा. संजय जाधव, अमोल भोसले, रान साठे, अबा सावंत, उदय देशमुख, सुरेश जगताप, संजय साळुंखे, आबा नवगिरे, सौरभ साळुंखे, पिंटू माने,प्रशांत देशमुख, विश्वास चव्हाण, गणेश भोसले आदी उपस्थित होते.