जालना : लाॅकडाऊन काळातही काही लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लाचेचे उद्योग सुरु असुन अंबड पंचायत समितीच्या एका कृषी विस्तार अधिकाऱ्यास जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. राजेंद्र विठ्ठलराव देशमुख (वय 57) वर्षे असे या कृषी विस्तार अधिकाऱ्याचे नाव असुन एका शेतकऱ्याकडून त्याने गुरुवारी (ता.28) पाच हजारांची लाच स्विकारली असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कृषी स्वावलंबन योजनेमध्ये विहीर खोदणेसाठी दोन लाख पनास हजार मंजूर झाले होते. देशमुख याने दोन लाखांचे बिल काढण्यासाठी दहा हजार यापूर्वी घेतले व बाकी राहीलेले 50 हजार चे बिल काढणे साठी पाच हजाराची मागणी केली होती. या पाच हजाराची लाच स्वीकारताना त्यास गुरुवारी पंचा समक्ष पकडले. सदरील कारवाई अरविंद चावरिया पोलीस अधीक्षक,औरंगाबाद, डाॅ. जमादार अपर पोलीस अधीक्षक औरंगाबाद, पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी एस.एस.शेख, पोलीस निरीक्षक जालना यांच्या पथकाने केली.