मुंबई : अब्जाधीश मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह येत्या 12 जुलै रोजी होणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून या विवाहाची देशभरात चर्चा आहे. सध्या या विवाहापूर्वीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात बॉलिवूड, क्रिकेट तसेच इतर जगतातील दिग्गज दिसतायत. याआधी अनंत-राधिकाचा ग्रँड प्र-वेडिंग सोहळा गुजरातच्या जामनगरमध्ये पार पडला होता. याच सोहळ्यादरम्यान मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी परिधान केलेल्याने कलेसची आता नव्याने चर्चा होत आहे. हा नेकलेस तब्बल 400 ते 500 कोटी रुपयांचा होता.
नेकलेसची किंमत 400 ते 500 कोटी
नीता अंबानी यांनी त्या प्रि-वेडिंग फंक्शनमध्ये मनिष मल्होत्राने डिझाईन केलेली खास कांचपीपूरम साडी परिधान केली होती.तर त्यांनी परिधान केलेल्या नेकलेसची किंमत तब्बल 400 ते 500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. तेव्हा हा नेकलेस नेमका कसा आहे, त्याची विशेषता काय आहे? असे अनेक प्रश्व विचारले जात होते.
नेकलेससोबत 54 कोटींची शाही रिंग
याच नेकलेससोबत नीता अंबानी यांनी यांनी परिधान केलेल्या डायमंड रिंगचीही तेवढीच चर्चा झाली होती. या रिंगला ‘मिरर ऑफ पॅराडाईज’ म्हणून जगभरात ओळखले जाते. या रिंगचीही किंमत तब्बल 54 कोटी रुपये आहे. ही रिंग मुघलांच्या शाही दागिन्यांचा एक भाग होती, असे म्हटले जाते. या रिंगवर मौल्यवान हिरो आहेत.