शिवरुद्र मुळे, आर्यन कटकमवार, वेदश्री बंडेवार यांना तिहेरी मुकूट,पुरुष एकेरीत उत्कर्ष शीलवंत विजेता.
प्रौढ दुहेरीत मुलगे, मलाणी जोडीचा खळबळजनक विजय.
सुयश गुरुकूल येथे खेळल्या गेलेल्या सोलापुर जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचा शेवटचा दिवस शिवरुद्र मुळे, आर्यन कटकमवार व वेदश्री बंडेवार यांनी तिहेरी मुकूट मिळवून गाजविला.
पंढरपूरच्या शिवरुद्र मुळेने मुले एकेरी 13 वर्षाखालील, मुले दुहेरी 13 व 15 वर्षाखालील या तीनही गटात विजेतेपद मिळविले. तसेच मुले एकेरी 15 वर्षाखालील गटात उपविजेतेपद मिळविले. आर्यन कटकमवार याने मुले एकेरी 17 वर्षाखालील, मुले दुहेरी 17 व 19 वर्षाखालील गटात विजेतेपद मिळविले. मुलींमध्ये वेदश्री बंडेवार हिने महिला एकेरी मध्ये समृद्धी वायकुळेचा पराभव करून कै. श्री. अनंतराव रेगे फिरता चषक मिळविला. तसेच तिने महिला दुहेरी मध्ये समृद्धी वायकुळे सोबत अजिंक्यपद मिळविले. मिश्र दुहेरी मध्ये राहुल तिवाडी सोबत अजिंक्यपद मिळवीत तिहेरी मुकूटाची मानकरी झाली.
पुरुष एकेरीमध्ये उत्कर्ष शीलवंत याने राजवर्धन वळसंगकर याचा पराभव करीत वामसीधर रेड्डी फिरता चषक मिळवून अजिंक्यपद मिळविले. तर पुरुष दुहेरीमध्ये राहुल तिवारी आणि आनंद मुसळे यांनी सलग तिसऱ्या वर्षी अजिंक्यपद मिळविले.
प्रौढ दुहेरीत 45 वर्षांवरील गटामध्ये मनोज मुलगे आणि शैलेश मलाणी यांनी अनुभवी अशा रवि वर्तक व जितेंद्र राठी यांचा खळबळजनक पराभव करीत अजिंक्यपद मिळविले. यावर्षीची स्पर्धा केल्वीनेटर आणि पु. ना. गाडगीळ & सन्स यांनी पुरस्कृत केली होती. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पु. ना. गाडगीळ कंपनीचे जितेद्र जोशी यांच्या हस्ते आणि प्रमुख पंच ब्रिजेश गौर यांच्या उपस्थितीत पार पडला.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र राठी, उपाध्यक्ष मनोज मुलगे, सचिव ओंकार दाते, सीमा जोग, शशांक कुलकर्णी, रवि वर्तक, सचिन जोग व इतर सभासदांनी प्रयत्न केले. पारितोषिक वितरण समारंभाचे संचालन मनोज मुलगे यांनी केले.
सर्व अंतिम सामन्यांचे निकाल खालील प्रमाणे –
पुरुष एकेरी – विजेता उत्कर्ष शीलवंत, उपविजेता राजवर्धन वळसंगकर, 21-16 21-6.
महिला एकेरी – विजेती वेदश्री बंडेवार, उपविजेती समृद्धी वायकुळे, 21-8 21-8.
पुरुष दुहेरी – विजेते आनंद मुसळे आणि राहुल तिवाडी, उपविजेते अथर्व देशपांडे आणि युगंधर कुलकर्णी, 21-16 21-16.
महिला दुहेरी – विजेत्या वेदश्री बंडेवार आणि समृद्धी वायकुळे, उपविजेत्या श्रेया मिस्कीन आणि तनिष्का पाटील, 21-13 21-17.
मिश्र दुहेरी – विजेते राहुल तिवाडी आणि वेदश्री बंडेवार, उपविजेते अथर्व देशपांडे आणि समृद्धी वायकुळे, 21-12 21-15.
11 वर्षाखालील मुले एकेरी – विजेता अद्वैत पवार, उपविजेता शुभंकर मुळे, 21-18 21-16.
11 वर्षाखालील मुली एकेरी – विजेती सिद्धी पवार, उपविजेती अलिया काझी, 21-15 21-14.
13 वर्षाखालील मुले एकेरी – विजेता शिवरुद्र मुळे, उपविजेता श्रीअंश हुबळीकर, 21-18 21-14.
13 वर्षाखालील मुली एकेरी – विजेती श्रुतिका बोरगांवकर, उपविजेती मधुरा जोशी, 21-7 21-9.
13 वर्षाखालील मुले दुहेरी – विजेते शिवरुद्र मुळे आणि शुभंकर मुळे, उपविजेते शौर्य बंडगर आणि अर्णव दोषी, 21-9 21-18.
15 वर्षाखालील मुले एकेरी – विजेता आदित्य सगर, उपविजेता शिवरुद्र मुळे, 21-2 21-5.
15 वर्षाखालील मुली एकेरी – विजेती श्रावणी सावंत, उपविजेती श्रुतिका बोरगांवकर, 21-13 21-8.
15 वर्षाखालील मुले दुहेरी – विजेते शिवरुद्र मुळे आणि शर्विल वेळापुरे, उपविजेते कृष्णा गुंडेवार आणि प्रतीक कवडे, 19-21 21-16 21-16.
17 वर्षाखालील मुले एकेरी – विजेता राजवर्धन वळसंगकर, उपविजेता आर्यन कटकमवार, 21-8 21-10.
17 वर्षाखालील मुली एकेरी – विजेती संतोषी डोल, उपविजेती श्रीनी मोरे, 21-16 16-21 21-18.
17 वर्षाखालील मुले दुहेरी – विजेते मीत बजाज आणि आर्यन कटकमवार, उपविजेते प्रणीत कवडे आणि राजवर्धन वळसंगकर, 11-21 23-21 21-19.
19 वर्षाखालील मुले एकेरी – विजेता राजवर्धन वळसंगकर, उपविजेता रेहान शेख, 21-14 21-8.
19 वर्षाखालील मुली एकेरी – विजेती श्रुति यादव, उपविजेती संतोषी डोल, 21-15 27-25.
19 वर्षाखालील मुले दुहेरी – विजेते श्रवण बजाज आणि आर्यन कटकमवार, उपविजेते संस्कार कुलकर्णी आणि सार्थक कुलकर्णी, 21-11 22-20.
प्रौढ एकेरी – विजेते शैलेश मलानी आणि मनोज मुलगे, उपविजेते जितेंद्र राठी आणि रवि वर्तक, 21-18 21-11.