सोलापुरातील बालाजी अमाईन्स लिमिटेडची CNBC इंडिया रिस्क मॅनेजमेंट अवॉर्ड्समध्ये पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (ESG) श्रेणीतील विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे. ही मान्यता विशेषत: ५०० ते १९९९ कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या मध्यम स्तरावरील कंपन्यांसाठी आहे.
CNBC इंडिया रिस्क मॅनेजमेंट अवॉर्ड्स भारतातील कंपन्यांना त्यांच्या उत्कृष्ट जोखीम व्यवस्थापन रणनीती आणि पद्धतींसाठी मान्यता देतात. या पुरस्कारांचे उद्दिष्ट व्यावसायिक समुदायामध्ये जागरूकता आणि प्रभावी जोखीम व्यवस्थापनाचा अवलंब करणे हे आहे. हे अवॉर्ड्स भारतातील विविध उद्योगांमधील जोखीम व्यवस्थापन पद्धतींमध्ये उत्कृष्टतेची निवड करतात. हे पुरस्कार म्हणजे शाश्वत आणि जबाबदार व्यवसाय पद्धतींमध्ये योगदान देताना जोखीम प्रभावीपणे कमी करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या निकषां आधारे ओळखून त्यांची निवड केली जाते.
दि. २७/०६/२०२४ रोजी मुंबई येथे हॉटेल सेंट रेजीस याठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बालाजी अमाईन्स लिमिटेडच्या वतीने श्री. जी. हेमंत रेड्डी यांनी पुरस्कार स्वीकारले.
यावेळी अधिक माहिती देताना व्यवस्थापकिय संचालक डी. राम रेड्डी यांनी सांगितले कि बालाजी अमाईन्सचा मूळ कच्चा माल वेगवेगळ्या उत्पादनांसाठी वापरला जातो, यात प्रामुख्याने जीवनावश्यक औषधे, प्राण्यांसाठीची खाद्य, शेती फवारणी औषधे, जलशुद्धीकरण, रबर, रासायनिक प्रक्रिया, टेक्सटाईल, पेंट्स, तेल व नैसर्गिक वायु आदी गोष्टींसाठी त्याचा वापर होतो. कंपनीचे उत्पादने ही ५० हून अधिक देशांना निर्यात केली जातात. CNBC इंडियाकडून मिळालेल्या पुरस्काराचा श्रेय त्यांनी सर्व व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना दिला.