सोलापूर : मे 2024 मध्ये घेण्यात आलेल्या श्रीकाशी जगद्गुरू विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठ जंगमवाडी मठ, वाराणसी आयोजित वीरशैव सिद्धांत प्रबोध, प्रवीण आणि पंडित या तिन्ही परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा प्रमुख राजेंद्र बलसुरे यांनी दिली.
या तीनही परीक्षेस संपूर्ण राज्यातून एकूण 600 विद्यार्थी बसले होते. या परीक्षांचा निकाल 99.83 टक्के इतका लागला आहे. राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व परीक्षार्थींना श्रीकाशी जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी तसेच श्रीकाशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी आशीर्वाद दिला आहे.
तसेच श्री दानम्मादेवी ट्रस्ट गुड्डापूरचे अध्यक्ष सिद्धय्या स्वामी-हिरेमठ, परीक्षा विभागप्रमुख राजेंद्र बलसुरे, सहाय्यक गुरुशांत रामपुरे, परीक्षा विभाग सदस्य डॉ. अनंत बिडवे, मार्गदर्शक डॉ.अनिल सर्जे, विद्यानंद स्वामी, राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे, सचिन विभुते यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि संबंधित केंद्र संचालकांचे अभिनंदन केले आहे.
राज्यस्तरीय निकाल
वीरशैव सिद्धांत प्रबोध परीक्षा मे 2024
राज्यात प्रथम स्मिता पाटील (सोलापूर), द्वितीय अपर्णा स्वामी (बीड), तृतीय मृणाली जंगम (महाड)
वीरशैव सिद्धांत प्रवीण परीक्षा मे 2024
राज्यात प्रथम रेणुकादेवी अक्कलकोटे (सोलापूर), द्वितीय वीरेंद्र चिल्ले (पुणे), तृतीय सुजाता चित्ते (बुलढाणा)
वीरशैव सिद्धांत पंडित परीक्षा मे 2024
राज्यात प्रथम डॉ. सीमा नारींगे (नागपूर) द्वितीय सरोजा पाटील (सोलापूर), तृतीय मंजुळा बगले (सोलापूर)