कृषी उत्पन्न बाजार समितीचा चौक होणार अपघातमुक्त : १८ महिन्यांत काम होणार पूर्ण
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील चौक आता लवकरच अपघात मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. बाजार समिती समोर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी पाहणी करून घेतला.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर २ किमीचा उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ५० कोटी रुपयांचा निधी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मिळवला आहे. त्याचा कार्यारंभ आदेशदेखील प्राप्त झाला असून लवकरच या कामात सुरुवात होणार आहे. त्याची पाहणी आ. देशमुख यांनी सोमवारी केली.
माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख म्हणाले, पुणे, हैदराबाद आणि विजयपूर येथून येणारी जड वाहने या चौकात एकत्र येतात. तसेच शेजारीच कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे भाजी, फळे, धान्यांची वाहतूक सतत सुरू असते. शेळगी, विडी घरकुल यांसारख्या मोठी नागरी वस्ती असलेल्या परिसराकडे जाण्यासाठी नागरिकांना या चौकातून जावे लागत असल्यामुळे या चौकात सातत्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो. परिणामी, दुर्दैवाने या चौकात झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे येथून उड्डाणपूल करण्यात यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. निधी मिळून कार्यारंभ आदेश मिळाल्यामुळे या मागणीला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे.
याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉ. किरण देशमुख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपाभियंता महेश येमूल, अनिल विपत, माजी सभागृह नेते संजय कोळी, श्रीशैल अंबारे, महालिंगप्पा परमशेट्टी, सुरेश हत्ती, एन. डी. जावळे, अमोल बिराजदार, बाळू पटेल, बसवराज इटकळे, शिवानंद पुजारी, हरीकांत सरवदे, ज्ञानेश्वर कारभारी, शंकर शिंदे, विरेश उंबरजे, सोमनाथ रगबले, राहुल शाबादे, विनायक बंग, धरीराज रमणशेट्टी, वैभव बरबडे, प्रविण कांबळे, संतोष मोकाशे, मल्लू कोळी, आनंद साळुंखे, नागेश रामपुरे, गणेश कोळी, गुड्डू निर्मळ, बाळू राऊत, रवी कोसगी, प्रशांत गायकवाड, राहुल घोडके, प्रकाश जाधव, महादेव जातकर, नागेश उंबरजे, आशिष दुलंगे आदी उपस्थित होते.
उड्डाण पुलाबाबत शनिवारी बैठक
सोलापूर शहरातील दोन उड्डाण पुलाबाबत येत्या शनिवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार आहे. दोन्ही उड्डाणपूलांचे काम लवकरात लवकर सुरू करुन लवकर पूर्ण व्हावे याबाबत चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समोरील २ किमी लांबीच्या उड्डाणपुलासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि शेळगीला जाण्यासाठी सर्व्हिस रोड करण्यात येणार आहे.
अनिल विपत, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
वारंवार होणाऱ्या जीवघेण्या रस्ते अपघात आणि वाहतूक खोळंब्यावर उपाय म्हणून माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी उड्डाणपूलासाठी निधी मंजूर करवून घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार.
नागेश उंबरजे, नागरिक