येस न्युज मराठी नेटवर्क : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे, यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व पर्यावरण दिवसापासून संपूर्ण विभागात स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली आहे. कार्यालयातील फाईल नीटनेटके ठेवाणे,तीन-चार वर्षापूर्वीचे जुने फाईलचे सॅाफ्ट कॉपी तयार करून त्या सर्व जुन्या फाईल स्टोर रूम मध्ये जमा कराव्यात. असे सर्व कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले होते.
त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 22 जून 2024 ला रेल्वे विभागीय कार्यालयात सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी श्रमदान करून विभागीय रेल्वे कार्यालयाचा परिसर स्वच्छ केला.
याप्रसंगी विभागीय व्यवस्थापक यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले, जे कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला आणि स्वतःहून स्वतःचा टेबल, अलमारी कार्यालय परिसर स्वच्छ ठेवले त्या कर्मचाऱ्यांचा कौतुक केले. काही कर्मचाऱ्यांना प्रशिस्तपत्र देऊन गौरवीत केले.
यावेळी अप्पर रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार, वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता रामलाल प्यासे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटिल, वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय)चंद्रभूषण, मुख्य चिकित्सा अधीक्षक रामकृष्ण माने, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी अरविंद कुमार भगत, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता(जनरल),अभिषेक चौधरी यांच्यासह रेल्वे विभागातील इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.