पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह. कवठेकर प्रशालेत दहावा जागतिक योग दिन संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अभ्यागत म्हणून योगशिक्षक विठ्ठलराव केसकर साहेब, राजेंद्र केसकर साहेब, क्रीडा शिक्षक गजेंद्र पवार सर उपस्थित होते. प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. एम. कुलकर्णी सर यांनी योग दिनाचे महत्त्व व निरोगी निरामय दीर्घायुष्याची गुरुकिल्ली म्हणजे भारतीय योग याची माहिती दिली. यावेळी योगशिक्षक पंढरपूर नगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी विठ्ठलराव केसकर यांनी योगासनाची माहिती दिली. योगशिक्षक कर सल्लागार रोटरीयन राजेंद्र केसकर यांनी योगाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्याकडून करून घेतली. यावेळी प्रशालेतील सकाळ सत्रचे सर्व विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द.ब. पाटोळे सर यांनी केले. आभार ज्येष्ठ शिक्षक आर. एस. कुलकर्णी सर यांनी व्यक्त केले. यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक आर.जी.केसकर सर,पर्यवेक्षक एम.आर. मुंडे सर, क्रीडाशिक्षक प्रशांत मोरे सर, एम.बी. कुलकर्णी सर, शेलार सर, संतोष पाटोळे सर, डी. एस. चव्हाण सर, जहागीरदार सर, चिंतामणी दामोदर सर उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रार्थना, ओंकार, बैठक स्थिती व दंड स्थितीतील विविध आसने, ध्यानस्थिती व मुद्रा यांचा सराव केला. कार्यक्रमात प्रशालेतील सर्व शिक्षक बंधुभगिनी, शिक्षकेतर बंधू व विद्यार्थी सहभागी होते.