सोलापूर : कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावातील नागनाथ देवस्थान कमिटीच्या व नागनाथ भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मार्डी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन पोलीस कॉन्स्टेबल अशोक खवतोडे यांच्या हस्ते करण्यात आले .या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गावातील प्रसिद्ध डॉक्टर चित्तरंजन भोजने व डॉक्टर जालिंदर चव्हाण प्रमुख उपस्थित होते.
मार्डीतील नागनाथ देवस्थानचे महाराज नागेश स्वामी यांच्या आवाहनाला युवकांनी प्रतिसाद येथील 59 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी सोलापूर येथील मेडी केअर ब्लड बँकेचे कर्मचारी यावेळी येथे उपस्थित होते. यावेळी या ठिकाणी थर्मल स्क्रीनिंग ची ही सोय करण्यात आली होती. डॉक्टर भोजने यांनी गावातील येणाऱ्या रक्तदाते व नागरिक यांची थर्मल स्कॅनिंग टेस्ट केली व या उपक्रमाबद्दल आभार मानले. याप्रसंगी अजित पाटील ,भगवान कदम ,मल्लिनाथ स्वामी ,शिवलिंग म्हेत्रे, अजित भिंगारे अमित भिंगारे, संजय खरटमल, संभाजी पाटील, गजेंद्र साठे ,किरण कदम, प्रवीण पवार ,पांडुरंग जाधव, उदय मुडके, अभिजीत धुमाळ गुरु भोपळे सुदर्शन पाटील यतिराज विटकर ,नागेश घाेडके आधी युवकांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.