सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सलग नऊ दिवस पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच मंडलांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाकडे झाले आहे. तसेच उजनी धरणामध्ये देखील गेल्या सहा दिवसात जवळपास सात टक्के एवढे पाणी वाढले आहे. बार्शी तालुक्यातील नागझरी आणि भोगावती या दोन्ही नद्या तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
दक्षिण सोलापुरातील कासेगावात पावसाच्या पाण्यात तिघेजण वाहून गेले होते सुदैवाने यातील दोघे बचावले अजूनही एक जण बेपत्ता आहे. मोहोळ तालुक्यातील मुसळधार पाऊस झाल्यामुळे सीना नदी देखील मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहेत. सांगोला, बार्शी, मोहोळ, माळशिरस, पंढरपूर यासह सर्व तालुक्यांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सोलापुरात मंगळवारी रात्रभर सुरू असलेला पाऊस आज सकाळी सहा वाजता थांबला.
काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ पर्यंत तब्बल 57 मिलिमीटर पाऊस सोलापुरात झाला. शहरातील सर्वच रस्ते ओढ्याप्रमाणे वाहू होते. एकूणच या पावसाने सोलापूर जिल्हा ओलाचिंब झाला आहे