सोलापूर : अनेक सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या लोकमंगल फाउंडेशनतर्फे नुकतेच आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते दोन भजनी मंडळांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
जुळे सोलापुरात भजन परंपरा जपणाऱ्या रेणूका आणि चिंतामणी भजनी मंडळास आ. सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते पेटी, मृदंग असे भजन साहित्य भेट देण्यात आले. मागील 6 वर्षापासून शोभा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे भजनी मंडळ आपली सेवा करत आहे. 70 महिलांचा सहभाग असलेले दोन्ही मंडळ सणावारात अनेक ठिकणी आपली भजन सेवा करत आहे. यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, महाराष्ट्राला भजन, किर्तनाची परंपरा लाभली आहे. ईश्वराचा नामघोष, जयजयकार आणि संगीताच्या माध्यमातून होणारी ही ईश्वर सेवा 21 व्या शतकात आजही अविरतपणे चालू आहे. यासाठी लोकमंगलचा थोडाफार हातभार लागावा म्हणून हा उपक्रम राबवला आहे.
लोकमंगल फाऊंडेशन अन्नदान, लोटस योजनेतून गरजू विद्यार्थ्यांना मदत, सर्वधर्मिय मोफत विविह सोहळा, आरोग्या योजना अशा अनेक योजनातून जनसेवा करीत आहे. यावेळी शोभा देशपांडे, कांचन कंदले, हेमा झाडबुके, सुधा रजपूत, असावरी देशपांडे, निलिमा शितोळे आदी उपस्थित होते.