सोलापूर : आषाढी वारी मार्गवर शासाना तर्फे केल्या जाणाऱ्या सोई सुविधा व्यवस्थापनासाठी व पालखी सोहळा व्यवस्थापन करणेसाठी मुख्यसचिव पदाचे अधिकारी नियुक्त करावेत म्हणजे सर्व पालखीची इतर व्यवस्था करणे व नियोजन करणे सोईचे होईल.
1) संत तुकाराम महाराज पालखी सोहळा व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गातील अपूर्ण रस्ते लवकर तयार करून घ्यावेत. या मार्गातील अतिक्रमण काढून घ्यावेत.
2) पालखी मार्गातील ग्राम पंचायातीना सूचना देऊन सोई सुविधा देणेसाठी मदत करावी.
3) पालखी मार्गातील टॉयलेट संख्या वाढवून स्वच्छते संबंधी कडक सूचना द्यव्यात. पिण्याचे पाणी टँकर संख्या वाढवून स्वच्छ पाणी पुरवावे.
4) वाहतूक व्यवस्था सक्षम करणेसाठी अनुभवी पोलिस अधिकारी नियुक्त करण्यात यावेत.
5) पंढरपूर येथील 65 एकर मधील प्लॉट वाटप लवकर कऱण्यात येऊन तेथील सर्व सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत.
6) पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिर आयोजित करुन सोय उपलब्ध करून द्यावी.
7) मानाच्या सर्व पालखीची व मार्गावरील व्यवस्था, सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी त्या त्या संबंधीत जिल्हाधिकारी सहेबाना पत्र पाठवून सूचना देण्यात यावेत
8) पाऊस जास्त असलेने सर्व पालखी मुक्काम स्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात यावेत.
9) सर्व पालखी मार्गातील भविकांचेसाठी त्या त्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावेत.
वरील सर्व मागणीचा विचार पुर्वक निर्णय घेऊन संबंधिताना सूचना देऊन पाठपुरावा ही करावा असे निवेदन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातुन ईमेल द्वारे देण्यात आले आहे असे सुधाकर महाराज इंगळे यांनी पत्रक काढून जाहिर केले.