मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी झूम ॲप द्वारे संवाद साधला. त्या वेळेस सोलापूर मधील परिस्थिती सांगितली आणि सोलापूरसाठी काही महत्वाच्या सूचना केल्या.
- १) शहरातील प्रमुख मोठे हॉस्पिटल कोविड केअर सेंटर साठी ताब्यात घ्यावी (६०%बेड ताब्यात घ्यावेत)
- २) स्वाब टेस्टिंग ची क्षमता वाढविणे तसेच खाजगी रुग्णालयामध्ये टेस्टिंग प्रस्ताव त्वरित मंजूर करावे
- 3) नोंदणी कृत रूगण्यालायात महात्मा जोतिबा फुले योजने अंतर्गत कोविड रुग्णावर तातडीने उपचार कारावेत
- ४) सोलापूर मध्ये प्रशासनामधील अधिकारी यांच्यात सुसंवाद व एकसूत्रता नाही आहे त्वरित त्या मध्ये लक्ष घालावे
- ५) मुंबई पुणे चे धर्तीवर सोलापूर शहरा मध्ये साथीचे रोगीचे निर्मूलनासाठी नवीन सुसज्ज हॉस्पिटल मंजूर करावे त्या साठी अनुदान उपलब्ध करावे