विजयपूर (राहुल आपटे) : येथील वेंकटरामण गल्ली मध्ये एका घरात चोरी प्रकरण पोलीसानी एका आरोपीला अटक केली व त्याच्या कडून लाखो रुपयेचे दागीने जप्त केले. आरोपी हा येथील गांधीनगर मधिल असून पण तो सध्या ग्यांगबावडी येथे राहणारा रोहीत राम कायगोंड (३२) हा असून, हा येथील सराफ बजार मध्ये सशंअस्यास्पद रित्या काल वावरत होता, मुफ्ती वर असलेल्या पोलीसानी त्याला चौकशी साठी ताब्यात घेतले व पोलीस ठाण्याला आण्यात आले, चौकशी मध्ये त्यानी कबूल केले कि वेंकटरामण गल्लीत एका घरात चोरीकेली आहे, पोलीसानी त्याच्या घराची झडती घेतली व त्याच्या घरातून १०८ ग्राम सोन्याचे दागीने, ४१० ग्राम चांडीचे भांडी, असे एकूण ३.२४ लाख रुपये ऎवज जप्त केले अशी माहीति जिल्हा वरीष्ठ पोलीस अधीकारी अनूपम अगरवाल यानी ट्वीट द्वारे कळवीले आहे.
प्रकरण उजेडात आण्यात पि.आय रवींद्र नायकोडी यांच्या नेतुर्त्वाखाली एस.बि.गौडर, बि.एम.पवार, एच.एच.जमादार, बाबू गुडीमनी, एन.के.मुल्ला, बशीराहमद शेख, विक्रम शहापूर, आर.एस.पुजारी, एस.एस.कंपेगौडा, एस.जी.अळ्ळीगीदड, यानी भाग घेतला होता. या सर्व पोलिसाना बक्षीस देण्यात येणार असल्याचे एस.पी. अनुपम अगरवाल यानी सांगीतले.