- जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांनी लावला मदतीचा हातभार
सोलापूर : प्रभाग क्रमांक सात मधील लोकांसाठी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी संपूर्ण प्रभागात शनिवार दिनांक २३ मे पासून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. थर्मल स्कॅनर द्वारे टेंपरेचर तपासनी ऑक्सिमीटरद्वारे ऑक्सिजन व पल्स तपासणी करण्यात येत आहे प्रथम दिवस प्रभाग सात मधील खमीतकर अपार्टमेंट,चातक सोसायटी,चिंच नगर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.एकूनन ४५०लोकांची तपासणी करण्यात आली.
जिल्हाधिकारी माननीय मिलिंद शंभरकर साहेब, पालिका आयुक्त दिपक तावरे साहेब महापौर श्रीकांचना यन्नम, टी व्ही ९ न्यूज चॅनेलचे रोहितजी पाटील, इन न्यूज चॅनेलचे प्रमुख समाधानजी वाघमोडे यांनी शिबिराला भेट देऊन पाहणी केली.
शिबिराचे नियोजन व हेतू पाहून जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांनी आम्ही या साठी कश्या पद्धतीने सहभाग नोंदवू शकतो म्हणून नगरसेवक देवेंद्र कोठे यांना विचारना करून संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच तातडीने जिल्हाधिकारी साहेब व पालिका आयुक्तांनी नगरसेवक देवेंद्र कोठे यांना या शिबिरासाठी दोन अतिरिक्त थर्मल स्कॅनर गण व ३००० मास्क व मल्टी विटामिनच्या गोळ्या स्लम एरिया मधील लोकांना वाटप करण्यासाठी तातडीने पाठवून दिले. देवेंद्र कोठे यांनी पालिका आयुक्त दिपक तावरे जिल्हाधिकारी मिलिंद, शंभरकर यांचे आभार व्यक्त केले
झिरो पेशन्ट झालेले कंटेन्मेंटट झोन १४ दिवस झाल्यानंतर लगेच शिथिल करण्याबाबत नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांना विनंती केली होती ज्या नागरिकांचे चौदा दिवस पूर्ण झालेले आहेत व पेशंट व कोरान्टीन मधील सर्व लोक नेगेटिव्ह आल्यानंतर त्या कंटेनमेंट झोनला शिथिल करण्यात यावी जेणेकरून कंटेनमेंट झोन मधील इतर नागरीकांना जास्त त्रास होणार नाही अशी विनंती केल्यानंतर या संबंधीत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ आणि इतर लोकांना बाहेर पडण्यासाठी मोकळीक देऊ असे आश्वासन दोघांनी दिले
या शिबिरात सोशल डिस्टन्स पालन करून नागरिकांना बसण्याची सोय करण्यात आली होती डॉ. राजगोपाल तापडिया (एमबीबीएस) व परिचारिका सौ. शिवगंगा शितलकुमार वाघमोडे ,अभिजित मुंगळे यांनी नागरिकांची तपासणी केली शिबिर यशस्वी करण्यासाठी बाबा शेख,अक्षय ऐवळे संभाजी गुंड,विनोद पवार दीपक शितोळे, क्रांती गोयल कुणाल पवार राहुल गोयल यांनी परिश्रम घेतले.
या वेळेस उपस्थिती किरण पवार, विठ्ठल आयवळे ,शहाजी राऊत,गुरुप्रसाद इनामदार,तबीब, राजन वर्मा ,कसबे,नंदी ,देशमुख काका,रानेश चव्हाण रंजना पवार,रूकमिनी आडेकर,ज्ञानेश्वर पवार, सुधाकर नकाते , आनंद जगताप,विष्णू आयवळे, संजय कांबळे, अभिषेक आयवळे, अजय मस्के, शुभम गवळी, रोहित कांबळे, सुरज होगडे ,सौदगर रणदिवे, राहुल कांबळे अनिकेत घाडगे ,अजय मस्के यांनी परिश्रम घेतले.