सोलापूर : ‘मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ । सर्वत्रा वरिष्ठ आदिशक्ती ।। संत एकनाथ महाराजांनी या अभंगात संत मुक्ताबाई यांचा अधिकार मांडला आहे. ज्ञानोबा, नामदेव, चांगदेव यांना केलेला उपदेश वरिष्ठ दर्जाचे आहेत, असे चरित्रातून दिसून येते. त्यांचा पारमार्थिक अधिकार मोठा होता, असे निरुपण ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी येथे केले.
राजेश कोठेनगर लक्ष्मीपेठ येथील संत मुक्ताई मंदिरात, संत मुक्ताई संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.शनिवारी मुक्ताई यांचा समाधी सोहळा होता. यानिमित्ताने मुक्ताई यांच्या जीवन चरित्रावर आधारित निरुपण इंगळे महाराज यांनी केले.
रविवारी सकाळी १० ते १२ यावेळेत ह.भ.प. अनंत महाराज इंगळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता करण्यात आली.काला ह.भ.प. प्रसाद निळोबा जांभळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. या सप्ताहसाठी तानाजी महाराज बेलेराव, शंकर भोसले, किशोर धायगुडे यांच्यासह मुक्ताई प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.