सोलापूर : पोलीस आयुक्तालय शहर आस्थापनेवरील मे २०२४ अखेर सेवानिवृत्त होत असलेले ४ पोलीस अधिकारी व २१ पोलीस अंमलदार-सहकुटुंब यांना पुष्पगुच्छ, शॉल, श्रीफळ, साडी व प्रमाणपत्र देऊन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी त्यांचा सत्कार करून त्यांचं पुढील आयुष्य आरोग्यदायी व सुख समृध्दीचे जावो, त्याबाबत मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.
शुक्रवारी, ३१ मे रोजी सायंकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पोलीस एम राजकुमार यांनी, पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर आस्थापनेवरील माहे मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा, सत्कार करुन त्यांचं अभिष्टचिंतन केले.
या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त (मुख्यालय) अजित बोऱ्हाडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. दिपाली काळे,
सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) राजन माने व तसेच वरीष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार, सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी व अंमलदार व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.