आव्हाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा आमदार सुभाष देशमुख यांची मागणी
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या निषेधार्थ मंद्रूप येथे आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या प्रतिमेस जोडोमार आंदोलन करण्यात आले. आमदार सुभाष देशमुख यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बुधवार महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही भूमिका घेतली होती. मात्र मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र असलेले एक पोस्टर फाडले. हा मुद्दा धरत भाजपने त्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले त्याचाच एक भाग म्हणून मंद्रूप मध्येही आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी आमदार देशमुख म्हणाले की जितेंद्र आव्हाड यांच्याकडून वारंवार बाबासाहेब आंबेडकर काल केलेले कृत्य निषेधार्य लवकरात लवकर कारवाई होणे गरजेचे आहे या कृत्यानंतर त्यांनी मागितलेली माफी म्हणजे केवळ नाटक असल्याचेही आमदार देशमुख म्हणाले. यावेळी मंद्रूप पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर तात्काळ करावी करण्यात यावी यासंदर्भात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, डॉ चनगोंडा हविनाळे, हणमंत कुलकर्णी, अतुल गायकवाड, अंबिका पाटील,संदीप टेळे,सुनील नांगरे,शशिकांत दुपारगुडे, यतीन शहा,गौरीशंकर मेंडगुदले, विश्वनाथ हिरेमठ, नितीन रनखांबे,भीमाशंकर बबलेश्वर,अभिजित कापसे,सूरज खडाखडे,सोमनिंग कमळे व तसेच भाजपा पदाधिकारी आणि उपस्थित होते.