सोलापूर सालाबाद प्रमाणे सोरेगाव येथील चौडेश्वरी व ग्रामदैवत श्री मलकारसिद्ध महाराज यांची यात्रा सहा जून रोजी आयोजित करण्यात येणार असून यावर्षी अकरा गावचे पालखी भेटी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेले असून हतुरचे श्री गुरु सोमलिंग, बबलादीचे श्री ताई कोणत्यावा देवी, इंदापूरचे श्री बळोगसिद्ध,गुरुदेहळीचे महासिद्ध, कॅनबागेचे अमोघसिद्ध ,संजवडचे श्रीरंगसिद्ध चिमराया ,सोरेगावचे अमोगसिद्ध ,बोराळचे श्री पिंडवड्या, सोरेगावचे मलकारसिद्ध , विंचूरचे अमोगसिद्ध ,व मंद्रूपचे बंडी मलकारसिद्ध या 11 गावच्या पालखीचे भेटी सोहळा सहा जून दुपारी ठीक तीन वाजता होणार असून त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता श्री मलकारसिद्ध खेळवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.