पंजाब : डेरा सच्चा सौदा गुरुमीत राम रहिमच्या यांच्या संदर्भील प्रकरणात न्यालायाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. बाबा गुरमीत राम रहीमसह चार जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने याबाबतच निर्णय दिला आहे. राम रहिमने सीबीआय न्यायालयाच्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर, सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द करत हायकोर्टाने हत्याप्रकरणात सर्वांची निर्दोष मुक्तता केली. 22 वर्षांपूर्वीच्या या खटल्यात 19 वर्षानंतर न्यायालयाने राम रहिमसह 5 जणांची मुक्तता केली. आरोपी अवतार सिंह, कृष्णलाल, जसबीर सिंह आणि सबदिल सिंह यांनाही न्यायालायने शिक्षेतून मुक्तता करण्यात आली आहे.
बलात्कार आणि दोन जणांची हत्या केल्याप्रकरणी 2009 मध्ये सीबीआय न्यायालयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहिम आणि इतर 4 जणांना दोषी ठरुन शिक्षा सुनावली होती. त्यानंतर, 18 ऑक्टोबर 2021 रोजी न्यायालयाने राम रहिमसह इतर चौघांना रंजीत सिंह हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यासंदर्भाने, राम रहिमने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, आज हायकोर्टाने राम रहिमसह चौघांची निर्दोष मुक्तता केली आहे.