पुणे : सध्या सोशल मीडियामध्ये कॅरी मिनाटी हे नाव तुम्ही वाचलेच असेल, कॅरी मिनाटी हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. सध्या त्याच्या यु ट्युब .वि. टिकटॉक या व्हिडीओमुळे तो पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या हा विषय सोशल मीडियावर खूपच रंगात असून कॅरी मिनाटीचा टिकटॉक मधील कलाकारांवर केलेल्या व्यंगाचा व्हिडीओ यु ट्यूब ने त्याच्या अकाऊंटवरून काढून टाकला आहे. टिकटॉकवर मनोरंजनाच्या नावाखाली लोकांना चांगला कंटेंट मिळत नाही असा दावा कॅरी मिनाटीने त्याच्या व्हिडीओ मधून व्यंग करून केला होता. कॅरी मिनाटी त्याच्या व्यंग, गाणे, रॅप, विनोदी भूमिका तसेच गेमिंगच्या व्हिडीओसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.
- कॅरी मिनाटी आहे तरी कोण
कॅरी मिनाटीचे खरे नाव अजय नागर असून तो हरियाणाच्या फरिदाबादचा रहिवासी आहे. अजय हा केवळ 20 वर्षाचा असून त्याचा जन्म 12 जून 1999 मध्ये फरिदाबाद मध्ये झाला. फरिदाबाद हे आपल्या देशाची राजधानी दिल्लीच्या अगदी जवळील शहर आहे. वयाच्या 10 व्या वर्षापासूनच अजयने त्याचा युट्युब चॅनेल तयार केला होता. त्या चॅनेलवर तो सनी देओलची मिमिक्री केलेले त्याचे गेमिंगचे व्हिडीओ अपलोड करत होता. त्याच्या त्या चॅनेलला जास्त प्रसिद्धी न मिळाल्याने त्याने नवीन चॅनेल तयार केले व त्या चॅनेलला कॅरी मिनाटी असे नाव दिले. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु आपल्या यु ट्यूबच्या करियरसाठी अजयने आपले शिक्षण अधर्वट सोडून दिले. 2016 मध्ये बारावीच्या परीक्षेस पात्र झालेल्या अजयने अर्थशाश्त्र विषयात नापास होण्याच्या भीतीने त्या विषयाची परीक्षाच दिली नाही. त्याने बऱ्याच कालावधीनंतर ती परीक्षा दिली. फक्त बारावी असणाऱ्या अजयने आज जगभरात आपले नाव कमविले असून भारतातील वैयक्तिक युट्युब क्रिएटर पैकी सर्वात वर अजय चे म्हणजेच कॅरी मिनाटी चॅनेलचे नाव आहे. आज तो त्याच्या युट्युब व्हिडिओमधून लाखो रुपयांची कमाई करत असून त्याची व्याप्ती आता खूप मोठी आहे.
- कसे घडले कॅरी मिनाटीचे करियर
अजय ने त्याच्या वयाच्या 10 व्या वर्षीच गेमिंगच्या व्हिडिओतून युट्युबवर व्हिडीओ अपलोड करण्यास सुरवात केली होती. त्याने त्याच्या करियरच्या सुरवातीला सनी देओलची मिमिक्री करून गेमिंग करण्यासाठी सुरवात केली होती. 2014 मध्ये त्याने कॅरी मिनाटी नावाचा चॅनेल सुरु करून त्यावर व्हिडिओ अपलोड करण्यास सुरवात केली होती. 2017 मध्ये त्याने कॅरी इज लाईव्ह नावाने अजून एक चॅनेल सुरु केला ज्यावर तो ऑनलाईन गेम खेळतो. त्याला त्याच्या या करियरमध्ये दीपक चार व्यवस्थापक म्हणून नेहमी मदत करत असतो. त्याने आपल्या फरिदाबादस्थित घरामध्येच व्हिडीओ बनविण्यासाठी स्टुडिओ तयार केला आहे. 2019 मध्ये टीसीरीज विरुद्ध त्याने प्युदीपाय असे व्यंगात्मक गाणे तयार केले होते. ते गाणे प्रेक्षकांना खूपच जास्त आवडले होते. व्हिडीओ अपलोड केल्यानंतर 24 तासांतच त्या व्हिडिओला 5 मिलियन व्हियू मिळाले होते.
- कॅरी मिनाटीचा कसा मिळालाय सन्मान
अजय नागर म्हणजेच कॅरी मिनाटीला आज पर्यंत 5 युट्युब क्रिएटर अवार्ड्स मिळाले आहेत. त्यातील त्याच्या कॅरी इज लाईव्ह या चॅनेलला सिल्वर व गोल्ड बटन त्याला मिळाले आहे तर त्याच्या कॅरी मिनाटी या चॅनेलला त्याला सिल्वर, गोल्ड तसेच डायमंड बटन सुद्धा मिळाले आहे. तसेच त्याला 2019 मध्ये टाइम चा नेक्स्ट जनरेशन लीडर अवार्ड सुद्धा मिळाला आहे.