सोलापूर: स्किन सिटी ग्रुपच्या दधीचि सोलर पॉवर या कंपनीतर्फे शासकीय औद्योगिक तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्था आयटीआय, विजापूर रोड, सोलापूर. येथे सोलर क्षेत्रामध्ये आयटीआय विद्यार्थ्यांसाठी संधी व रोजगार या विषयावर दिनांक १६ मे रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
आयटीआय मधील इलेक्ट्रिकल, वायरमन, ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल आणि सिविल आणि इतर ट्रेंडच्या विद्यार्थ्यांना सोलार क्षेत्रामध्ये विविध संधी उपलब्ध आहेत. याबाबत दधीचि सोलर पॉवर कंपनीच्या तज्ञांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला स्किन सिटी ग्रुपचे संस्थापक डॉ नितीन ढेपे, आय टी आय चे प्राचार्य जाधवर, दधिची सोलर चे सागर गुरव, राधिका मराठे, प्रशिक्षक शिरीष शेळके सर, कोंडगुळी सर, काशीद सर आदी उपस्थित होते.
सौरऊर्जा किंवा सोलर एनर्जी हे अतिशय वेगाने वाढणारे क्षेत्र असून भारताच्या ऊर्जेच्या गरजा भागवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करावी. असे दधीचि सोलरचे संचालक श्री. सागर गुरव यांनी सांगितले. आय टीआय मधील आपल्या स्वतःच्या ट्रेड बरोबरच, सोलार आणि त्या संबंधित इतर कौशल्य आत्मसात केले तर या क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत असे स्किन सिटी ग्रुपचे संस्थापक डॉक्टर नितीन ढेपे यांनी सांगितले.
सोलापूर आयटीआय मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देतो. या वर्षी पासून नवीन आयटीआय सोलर प्रशिक्षण ची मान्यता महाराष्ट्र शासन काढून मिळाले आहे, असे विजापूर रोड आयटीआयचे प्राचार्य श्री. जाधवर यांनी सांगितले.
तांत्रिक कौशल्य बरोबर सॉफ्ट स्किल म्हणजे संवाद संभाषण आणि समूहात वावरण्याचे कौशल्य तितकेच आवश्यक आहे असे सौ राधिका मराठे यांनी सांगितले.
दधीचि सोलर पावर ही सौरऊर्जेच्या क्षेत्रामध्ये अत्यंत वेगाने वाढणारी कंपनी असून सोलापूर, धाराशिव, लातूर ,बीड, पुणे, नवी मुंबई या भागामध्ये सोलर सिस्टिम बसवण्यामध्ये अग्रगण्य आहे. दधीचि सोलर मध्ये आयटीआय पास किंवा नापास तांत्रिक यांना काम करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत असे श्री. प्रशांत दोशी यांनी सांगितले.
डॉ. नितीन ढेपे यांनी या कार्य शाळे मध्ये कमवा आणि शिका या तत्वावर पंधरा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ट्रेनिंग आणि अर्धवेळ रोजगार अशी संधी जाहीर केली. शेळके सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.