सोलापूर : कोरोना विरोधात जीव धोक्यात घालून लढणाऱ्या सोलापूरातील डॉक्टर, पोलीस, आरोग्य , स्वच्छता कर्मचारी तसेच विविध माध्यमातील पत्रकार या योद्ध्यांना त्यांच्या महत्वपूर्ण कार्यासाठी श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने कृतज्ञता पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या आरोग्य रक्षकांना सलाम करण्यात आला.
वैद्यकीय क्षेत्रातील अरुणप्रभा क्लिनिकचे डॉ.उत्कर्ष वैद्य, ओंकार हेल्थ केअरचे डाँ.जगदीश पाटील, शेळगी सरकारी आरोग्य केंद्र येथील डाँ.सिध्दाम पाटील, हेमलता टोणपे, लक्ष्मीकला वंगा, पोलीस प्रशासनातील जोडभावी पोलीस स्टेशनचे प्रकाश गायकवाड, अतुल गवळी, नंदाराम गायकवाड व शेळगी पोलीस चौकी मच्छिंद राठोड, रविंद्र जाधवचे पोलीस कर्मचारी ,
स्वच्छता विभागाचे कर्मचारी तमन्ना केगांर, देवेंद्र मन्याळ, संकेत जुमनारकर, कैलास गायकवाड, अनिल दोडमनी यांच्यासह पत्रकार आदी कोरोना विरोधातील योद्ध्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात पत्र देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. राहिलेल्या योद्ध्यांना कृतज्ञता पत्र व्हाट्सएपद्वारे ऑनलाइन देऊन गौरविण्यात येणार आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. गणेश लेंगरे नितीन साबळे, महेंद्र तळभंडारे, शुभम हंचाटे, रवि नावदंगीकर, सिध्दाराम कासे, सतिश हक्के, युवराज यलशेट्टी, गौरीशंकर बालशेट्टी, बसवराज पचडे आकाश शिंदे आणि आँनलाईन पत्र डिटीपी करण्यासाठी तुलसी ग्राफिक्सचे श्याम खंडेलवाल आदीचे सहकार्य लाभले.
चौकट : आरोग्य रक्षकांचे आम्ही ऋणी : कासट
कोरोना-१९ या जागतिक महामारीत सोलापूरातील डाँक्टर, पोलीस, पत्रकार व स्वच्छता कर्मचारी यांनी जीवधोक्यात घालून कार्यरत आहेत. यामुळेच सर्वजण घरात बसून सुरक्षित आहेत. त्यांचे सोलापूरकर ऋणी आहे. कृतज्ञता पत्र देऊन त्यांचा सन्मान करणे कर्तव्य आहे. म्हणून हा ऑनलाईन कृतज्ञता सोहळा श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आला अशी भावना संस्थापक महेश कासट यांनी व्यक्त केली.