मोहोळ/दादासाहेब गायकवाड : बिबट्या सदृश्य असणाऱ्या प्राण्याने पाटकूल ता मोहोळ येथे धुमाकूळ घातला असून गेल्या पंधरा दिवसात त्याने तिसऱ्यांदा हल्ला केला आहे. दि १६ मे रोजी रात्रौ ११ वा च्या दरम्यान पाटकूल शिवारातील विनायक बाबुराव काळे यांच्या शेतातील शेड समोर दावणीला बांधलेल्या गायीच्या पिल्लावर जीवघेणा हल्ला केला त्यावेळी आसपासचे शेतकरी जमा झाल्याने त्या जंगली बिबट्या सदृश्य प्राण्याने तेथून पळ काढला मात्र त्या हल्ल्यात गायीचे पिल्लू मरण पावले.
या घटनेची माहिती वनविभागाचे वनपाल सागर जवळगी याना देण्यात आली आहे. त्या गायीच्या पिल्लाच्या मृत्यूचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे वनपाल सागर जवळगी यांनी सांगितले.