सोलापूर : मतदानाचा दिवस अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेला असताना सोलापुर जिल्ह्यातील डॉक्टर संघटनांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे डॉक्टर संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य डॉक्टर संतोष कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी व निवडणूक आयोग यांना ईमेल द्वारे कळविले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील खाजगी दवाखान्यांमध्ये बायोमेडिकल वेस्ट (जैविक कचरा) याची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेकडून एस एस सिस्टीम या संस्थेला ठेका दिला असून संस्थेने कचरा विल्हेवाट करण्याचे चार्जेस डॉक्टरांना विश्वासात न घेता परस्पर चौपट हून अधिक वाढवले आहेत. या विरोधात सोलापुरातील सर्व डॉक्टर संघटनेच्या प्रतिनिधींनी महापालिका आरोग्य अधिकारी व आयुक्त यांना भेटून वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे सोलापुरात खाजगी दवाखान्यातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर वारंवार निवेदन देऊन प्रयत्न करूनही तोडगा न निघाल्याने जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांच्या संघटनांनी मतदानावरच बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.