दक्षिण सोलापूर .दि,१६(प्रतिनिधी )भंडारकवठ्यात सायंकाळीवादळी वाऱ्यास गारांचा पाऊस झाला .यामध्ये ठिकठिकाणी झाडे उन्मलून पडली तर विजेच्या ताराही तुटून पडल्याने गावात अंधाऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे .
सोलापूर जिल्हा आणि शहर परिसरात गेले तीन दिवसापासून ठिकठिकाणी वादळीवार्यासह अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे .
आज शनिवार दि,१६ रोजी सायंकाळच्या सुमारास भंडारकवठ्यात अचानक वादळीवार्यासह अवकाळी पावसानी हजेरी लावली गावातील काही भागात गारांचा पाऊस झाला ,काही ठिकाणी झाडे उन्मलुन पडली तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्या . काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून पडल्याचे वृत्त आहे .विजेच्या तारा तुटून पडल्याने भंडारकवठे गावात अंधाऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे ,