मुनी सेवच पुण्य हे सगळ्यात मोठ पुण्य आहे मुनी सेवा हीच पुण्य सेवा
आस्था सामाजिक संस्था ( आस्था रोटी बँक) व श्राविका संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १00८ भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्ताने हा कार्यक्रम श्राविका संस्थेच्या बहुउद्देशीय सभागृहात संपन्न झाला. सोलापूर शहर व आसपासच्या परीसरामध्ये येणाऱ्या सांधू, संत,त्यागी वृत्तींची सेवा करणाऱ्यामध्ये आपण तन,मन,धनाने सतत कार्यरत असता आपला अमूल्य वेळ देऊन आपण त्यांच्या सेवेसाठी ( विहार, आहार, वैयावृत्ती,निवास) समर्पित असता आपल्या या भरीव योगदानाबद्दल त्यागी सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यस प्रमुख पाहुणे म्हणून पराग शहा ( विश्वस्त वालचंद शिक्षण समुह) हर्षवर्धन शहा (अध्यक्ष आस्था रोटी बँक ), मिहीर गांधी ( संस्थापक अध्यक्ष श्री सन्मती सेवा दल ) आनंद तालिकोटी ( उपाध्यक्ष आस्था सामाजिक संस्था) अनिल जमगे ( संचालक आस्था सामाजिक संस्था ) सुहास छंचुरे ( सचिव आस्था सामाजिक संस्था) यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कारांचे स्वरूप सन्मानपत्र शाल ,श्रीफळ, मोत्यांची माळ असे होते.
याप्रसंगी पराग शहा आपल्या मनोगतामध्ये म्हणाले पुरस्कार मिळण्यापेक्षा खरंच तुम्ही पुण्यवान जीव आहात की मुनी सेवा आपण करता आणि मुनी सेवेचा पुण्य हे सगळ्यात मोठे पुण्य आहे आपण जी सेवा करता त्याला तोड नाही समोर बसलेले हे सर्व पुण्यवान जीव आहेत मला असं वाटते की आपणपण कुठेतरी थोडं पुण्य केला असेल की आज आपल्या हस्ते हा पुरस्कार दिला जातोय प्रत्येक श्रावकांनी मुनी सेवा केली पाहिजे या पुरस्कारामुळे इतरांना प्रेरणा मिळेल असे म्हणाले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश शिरढोने यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल जमगे यांनी मानले. या पुरस्कार सोहळ्यास जैन समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश कुंदुर, सिद्धू बेऊर, वेंदात तालकिटो, पिंटू कस्तुरे, बसप्पा कुंभार हरी ऐवळे, चंद्रशेखर कबाडे, शाश्वत पाटील सुनंदा भालेराव यांनी परिश्रम घेतले
त्यागी पुरस्कार सेवा महिला
(1) ब्र.अनंतमती बेडकीहाळ
(2) अलका पालिया
(3)कांचन मोहरे
(4) शोभा कळसकर
(5) पल्लवी मेहता
(6) स्वाती कोठारी
(7) सुरेखा कांबोज
(8) बाहुबली शेटगार
(9) किशोर मेहता
(10) बाहुबली शहा
(11) धन्यकुमार शहा
(12) प्रतिक गांधी
(13) राकेश शहा
(14) हरिषकुमार शहा
(15) सुनिलजी वेद
(16)अभिषेक गांधी
(17)प्रविण दोशी
(18) देशभुषण व्हसाळे
(19) कोमल पाचोरे
(20)पंकजा पंडित
(21) सुवर्णा कस्तुरकर
(22) नैनमल कांकरिया
(23) बसप्पा कुंभार