तब्बल 40 वर्षांचे राजकीय वैरत्व संपवत माळशिरस तालुक्यातील नेते उत्तम जानकर यांनी अखेर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.
जानकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पेशल हेलिकॉप्टर पाठवून चर्चेसाठी बोलावून घेतले होते. त्यांच्याशी चर्चा करून माळशिरसला परत आलेल्या जानकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही भेट घेतली.
दरम्यान, त्यांनी आज मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याने माढा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.