वाढत्या उन्हाची नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे – अधिष्ठता डॉ. सदानंद भिसे
सोलापूर : उष्माघाता पासून बचाव करण्यासाठी प्रत्येकानी काळजी घेणे गरजेचे आहे. या उष्माघाताचे शरीरावरती चक्कर येणे, अशक्तपणा येणे, थकवा जाणवणे, ताप येणे ,बेशुद्ध पडणे, फेफर येणे, अशा प्रकारची लक्षणे असतात. अशावेळी रुग्णांनी अधिक वेळ न घालवता सिव्हिलमध्ये दाखल व्हावे. असे मत अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी व्यक्त केले.
सध्या सोलापूर मध्ये उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात येत असून तापमानातही वाढ झाली आहे .या वाढत्या तापमानाचा नागरिकांना त्रास होत असून उष्माघातकाचा एखाद्याला जर त्रास झाला तर सिव्हिल रुग्णालयामध्ये दहा बेड असलेल्या अशी दक्षता विभागांमध्ये स्वतंत्र उष्माघातक कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी तज्ञ डॉक्टरांची नेमणूक ही करण्यात आली आहे. या कक्षाच्या उद्घघाटन प्रसंगी अधिष्ठाता सदानंद भिसे हे बोलत होते.
यावेळी औषध वैदिकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विठ्ठल धडके, डॉ. शुभांगी धडके, डॉ. वैभव लादे, डॉ .अनिता बंदीछोडे, न्यूरोलॉजिस्ट सचिन बांगर, कार्डिओलॉजिस्ट डॉ. दीपक गायकवाड ,डॉ. शुभम साबणे डॉ. प्रल्हाद मुन्शी, डॉ. प्रसाद बोरकर, डॉ स्मित जानराव, डॉ.उत्कर्ष छणबुरे, डॉ. दिनेश कतरे ,डॉ. संदीप होळकर, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, डॉ. विवेक अग्रवाल ,डॉ. ऋतुजा गजभार, डॉ.अश्विन शिवशरण, डॉ. दिनेश. डॉ.अक्षय कुटे ,डॉ. दिनेश देवराज, डॉ.अश्विन पुंड , डॉ .नितीन बतलवार, डॉ प्रशांत खरात. आधीसह ए ब्लॉक मधील डॉक्टर, सिस्टर ,ब्रदर व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उष्माघात झाल्यास अशी घ्या काळजी
सध्याच्या वाढत्या तापमानाचा धोका नागरिकांना होण्याची शक्यता आहे. जर का उष्माघाताचा त्रास होऊ लागला, तर रुग्णाला त्वरित भरपूर प्रमाणात पाणी पिण्यास द्यावे , अंग थंड पाण्याने पुसून घ्यावे, पंखा , एशी, कुलर अशा थंड हवेच्या ठिकाणी त्यास थोडा वेळ बसवावे, आणि पुढील उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावा.